नरेंद्र मोदींना भेटून पालटलं या खेळाडूचं नशीब

साऱ्याचे श्रेय ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देते

मुंबई, ३० ऑगस्ट- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवून देणाऱ्या अंकिता रैनाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. २५ वर्षीय रैना ही सानियानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सध्या अंकितावर कौतुकांचा वर्षाव होत असताना या साऱ्याचे श्रेय ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देते.मोदींबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, ‘२०१३ मध्ये मी नरेंद्र मोदी यांना भेटले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या भेटीनंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मोदींना भेटल्यानंतर गुजरात सरकार आणि गुजरातचे क्रीडा प्राधिकरणाने (एसएजी) मला अनेक प्रकारे मदत केली. भारतात परतल्यानंतर मी अहमदाबादला जाऊन एसएजीच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे आभार मानणार आहे.’सध्या अंकिताचे लक्ष २०२० मध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिक गेमवर आहे. यासाठी तिला टॉप १०० मध्ये येणं गरजेचं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंकिताने चायनाच्या शुआंग झांगला कडवी झुंज देत ४-६, ६-७ (६) असा पराभव केला. शुआंग ही जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानावर आहे.

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला?

Trending Now