पाकिस्तानने आशियाई खेळात किती पदकं मिळवली माहीत आहे का?

एकीकडे भारत आशियाई खेळात दैदिप्यमान कामगिरी करताना दिसत आहे. भारत- पाकिस्तान या देशांमध्ये प्रत्येक गोष्टीत चुरस लागताना दिसते. देशाची सीमा रेषा असो किंवा क्रिकेटचा एखादा सामना असो प्रत्येक ठिकाणी या दोन्ही देशांना सरस व्हायचं असतं. भारताला कबड्डीमध्ये कांस्यपदक मिळालं तर पाकिस्ताननेही याच खेळात कांस्यपदक मिळवलं.

भालाफेकीत भारताच्या नीरज चोपडाला सुवर्णपदक मिळालं तर याच खेळात पाकिस्तानच्या अर्शद नदीमला कांस्यपदक मिळालं. एकीकडे भारताने ४५ पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. यात ८ सुवर्ण १६ रौप्य आणि २१ कांस्यपकदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला फक्त तीन पदकं मिळवण्यात यश आलं आहे. हे तीनही कांस्यपदकंच आहेत.

Trending Now