Asian Games 2018 : नवरा अपयशी तर बायकोने दिली भारताला दोन पदकं

१८ व्या आशियाई क्रीडा प्रकारात महिला खेळाडू एकापेक्षा एक सरस कामगिरी करत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट टीम नैराश्यजनक कामगिरी करत आहे तर दुसरीकडे आशियाई खेळात अनेक खेळाडू देदिप्यमान कामगिरी करताना दिसत आहेत. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकर हे त्यातलंच एक उदाहरण.

भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी दिनेश फार मेहनत घेत आहे. पण तरीही त्याला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीमध्ये त्याला वगळण्यात आलं. दीपिकाची आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद आहे. स्कॉशमध्ये तिने एकेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तर सांघिक प्रकारात दीपिकाने रौप्यपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत मलेशियाच्या संघाला २-० ने हरवून अंतिम फेरीत भारतीय स्कॉशपटूने स्थान मिळवले. अंतिम फेरीत त्यांचा सामना काही दमदार नव्हता त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

Trending Now