Asian Games 2018:अरपिंदर सिंहची 'सुवर्ण'झेप,भारताच्या खात्यात दहावे 'गोल्ड'!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर पडलीये.

29 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर पडलीये. अरपिंदर सिंहने ट्रिपल जंप प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अरविंद सिंहने 16.77 मिटर अंतर पार करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्णपदकांची कमाई केलीये.आज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताला समाधानकारक राहिला. भारतीय स्प्रिंट क्वीन दुती चंदने दुसरे पदक पटकावले. 100 मीटर शर्यंत जिंकणारी दुती चंद ने 200 मीटर शर्यंतीत रौप्यपदक पटकावले. तर दुसरीकडे टेबल टेनिसमध्ये मिक्स्ड डबल्समध्ये मनिका बत्रा आणि शरत कमल यांनी कास्यपदक पटकावले. सेफीफायलनमध्ये चीनच्या जोडीकडून पराभूत झाले त्यामुळे कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

तर बाॅक्सिंगमध्ये भारताचे आणखी एक पदक पक्के झाले आहे. बाॅक्सर अमित पंघल आणि विकास कृष्ण यांनी सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. त्यामुळे कास्यपदक पक्के झाले आहे. पण दोन्ही खेळाडूंकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

Trending Now