एलिस्टर कुकचा 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड तोडणं अशक्य

भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सर्वात यशस्वी फलंदाज एलिस्टर कुकने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात तो इंग्लंडकडून अखेरचा सामना खेळणार आहे. ज्या संघासमोर आंतरराष्ट्रीय खेळाची सुरूवात केली होती, त्याच संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळण्याची संधी साऱ्यांनाच मिळत नाही. तसे पाहिले तर एलिस्टर कुकच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. मात्र त्याचा एक रेकॉर्ड सहसा कोणी मोडू शकेल असं वाटत नाही. कुक इंग्लंडकडून सलग १५८ कसोटी सामने खेळला. भारताविरुद्धचा पाचवा कसोटी सामना हा त्याचा १५९ वा सामना असणार आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सध्या ज्या पद्धतीने कसोटी सामने खेळले जातात, त्यावरुन कुकचा हा रेकॉर्ड मोडणं जवळपास अशक्य आहे असेच म्हणावे लागेल.

२००६ मध्ये नागपूर कसोटी सामन्यात कुकने पदार्पण केले होते. २००६ पासून आतापर्यंत इंग्लंडने १६० कसोटी सामने खेळले आहेत. यातील १५९ सामन्यात कुक होता. तो फक्त एक कसोटी सामना खेळू शकला नव्हता. एकीककडे इंग्लंडचे खेळाडूं फार काळ क्रिकेटमध्ये टिकून राहू शकत नाहीत असे चित्र असताना कुक मात्र नुसता टिकलाच नाही तर त्याची कामगिरीही सर्वोत्तम राहिली. यात इंग्लंड बोर्डाचंही कौतुक करावं लागेल, ज्यांनी कुकच्या चांगल्या वाईट काळात त्याला साथ दिली. सलग कसोटी सामने खेळण्याच्या या शर्यतीत कुकनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा एलन बॉर्डर आहे. एलनने १५३ कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून सलग कसोटी सामने खेळण्याचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनील यांनी १०७ सामने खेळले आहेत. कुकने इंग्लंडच्या कसोटी सामन्यात सर्वात जास्त धावा केल्या आहेत. कुकने त्याच्या कसोटी क्रिकेटची सुरूवात १ मार्च २००६ मध्ये भारताविरुद्ध केली होती. एलिस्टर कुकचा स्ट्राइक रेट ४४.८८ ही चांगला आहे. कुकने आतापर्यंत १२२५४ धावा केल्या आहेत.

Trending Now