जीएसटीनंतर आयपीएल सामने मैदानावर जाऊन पाहणं महागणार

सर्वात लोकप्रिय ठरलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजेच आयपीएलचे सामने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहणं आता महाग पडणार आहे, या स्पर्धेच्या तिकिटावर आता 28 टक्के जीएसटी लागणार आहे

Sonali Deshpande
30 जून : सर्वात लोकप्रिय ठरलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजेच  आयपीएलचे सामने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहणं आता महाग पडणार आहे, या स्पर्धेच्या तिकिटावर आता 28 टक्के जीएसटी लागणार आहे, याव्यतिरिक्त बीसीसीआयने आयोजित केलेले सामने,ज्या मध्ये दोन देश खेळतात, त्यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि T-20 या सामन्यांच्या तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे.तसेच इतर खेळांच्या सामन्याची तिकिटंही 18 टक्के कराच्या कक्षेत येणार आहेत. सर्व खेळाच्या तिकिटांवर सरसकट 28 टक्के कर लावण्यात आला होता, मात्र गुरुवारी झालेल्या बैठकीत आयपीएलसारख्या स्पर्धा वगळता हा कर 18 टक्के करण्यात आला, 250 रुपयापर्यंतच्या तिकिटांना कराच्या कक्षेतून वगळण्यात आलंआहे, मात्र एवढ्या कमी दाराची तिकिटे फार थोड्या स्पर्धांसाठी ठेवलेली असतात.

Trending Now