डीएसकेंनी घेतलेले पैसे गेले कुठे?

डीएसके यांच्याकडे ठेवलेल्या ठेवीत सामान्यांच्या कमाईचे पैसे होते. हे पैसे कुणाच्या खात्यावर परस्पर वळवण्यात आले?

Sonali Deshpande
वैभव सोनावणे, पुणे, 01 मार्च : डीएसके यांच्या अटकेनंतर ठेवीदारांच्या मनात प्रश्न डोकावतोय तो डीएसके यांनी घेतलेले पैसे नेमके गेले कुठे? डीएसके यांच्याकडे ठेवलेल्या ठेवीत सामान्यांच्या कमाईचे पैसे होते. हे पैसे कुणाच्या खात्यावर परस्पर वळवण्यात आले?डीएसकेंच्या घोटाळ्याचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत. त्यातून जी माहिती येतेय ती धक्कादायक आहे. डीएसके यांच्याकडे आलेले कोट्यवधी रुपये हे बेकायदा वळवण्यासाठी माध्यम होत ते हेमंती कुलकर्णी यांचं. हेमंती या डी एस कुलकर्णी यांची पत्नी. डीएसकेंनी ठेवी घेतलेल्या ६ कंपन्यांमधून कोट्यवधी रुपये हे हेमंती यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर हेमंती यांच्या खात्यातून मुलगा शिरीष आणि अन्य ठिकाणी हे पैसे फिरवले गेले.ठेवीदारांकडून पैसे घेण्यासाठी डीएसके यांनी डीएसके नावाशी साधर्म्य असेलल्या ६ वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांमधून घेतलेले पैसे, कर्जं, फ्लॅटसवर काढलेली कर्ज अश्या अनेक माध्यमातून डीएसके यांनी पैसे उभे केले मात्र हे सगळे पैसे हेमंती यांच्या खात्यात वर्ग केल्याचं समोर आलंय. अनेक खाजगी खात्यांवर हे पैसे वळवण्यात आलेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे या पैशांचा वापर खाजगी उद्योगासाठी करण्यात आलाय असा संशय सरकारी वकिलांना आहे.

डीएसके यांच्यासह हेमंतीसुद्धा पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या तपासातून धक्कादायक तपशील समोर येतोय.

Trending Now