संगमनेरचा 'एक इडियट', एकदा चार्ज केल्यावर धावणार 80 किमी सोलर कार !

Sachin Salve
14 डिसेंबर : मंडळी हा जमाना स्मार्टनेसचा आहे. असाच स्मार्टनेस दाखवत संगमनेरच्या इंजिनिअररिंगच्या विद्यार्थ्यांनी एक कार बनवलीये. ही कार पाहून एक गाडी बाकी अनाडी असंच म्हणावं लागेल.तशी ही कार दिसायला काही खास नाहीये, पण रस्त्यांवर धावणाऱ्या कारपेक्षा स्मार्ट आहे हे नक्की. कारण ही आहे सोलर कार.संगमनेरच्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ही सोलर कार बनवलीय. ही कार चालवण्यासाठी शून्य खर्च येतो. कारच्या छतावर सोलर पॅनल लावण्यात आलेत. तर कारचं इंजिन काढून त्या ठिकाणी बॅटरीज लावण्यात आल्यात. ही कार पूर्ण चार्ज झाल्यावर ऐंशी किलोमीटरपर्यंत धावत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय.या कारचा आवाज तर येतंच नाही पण प्रदूषणही होत नाही. भविष्यात या कारची क्षमता वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा विचार आहे. सौरउर्जेशिवाय विजेवरही कार चार्ज करण्याचा पर्याय कारमध्ये आहे.

Trending Now