गणेशोत्सवाचं ‘मॅनेजमेंट’ : तेजुकायाचा राजा, ते दहा दिवस कार्यकर्त्यांसाठी ‘दिवाळी’

मुंबईत गणेशोत्सवाचा खरा माहौल बघायचा असेल तर कुठे गेलं पाहिजे? असा प्रश्न विचारला तर त्याचं नि:संदिग्ध उत्तर आहे ‘लालबाग’. गेल्या अनेक दशकांपासून ‘लालबाग’ची ही ओळख आहे. या भागातले बहुतांश चाकरमाने हे कोकणातून मुंबईत आलेले. येताना त्यांनी गणेशोत्सवाची ऊर्जाही सोबत आणली आणि त्यामुळे मुंबईचं सांस्कृतिक वातावरण आणखी समृध्द झालं. लालबागच्या गणेशोत्सवात ज्या मोजक्या उत्सव मंडळांनी आपली छाप सोडली त्यात तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वरचा क्रमांक आहे. १९६७ मध्ये मंडळाची स्थापना झाली. मंडळाचं यंदाचं हे ५२ वं वर्ष आहे. त्यामुळं तयारीही जोरदार आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. बैठकांचं सत्र सुरू आहे. कामांची अंतिम ट्प्यातली आणखी केली जात आहे. कार्यकर्त्यांना जबाबदारीची वाटणी करण्यात येत आहे. सगळ्यांना वेध लागलेत ते फक्त बाप्पांच्या आगमनाचे.गणेशोत्सव’ हा आमच्यासाठी ‘दिवाळी गणपतीचं आगमन म्हणजे आनंदाचं, मांगल्याचं आगमन असतं. वर्षभरातला सर्व थकवा आणि दु:ख १० दिवस विसरायचं आणि बाप्पाच्या सेवेत वाहून घ्यायचं हे गेली वर्षानुवर्ष चालत आलय. त्यामुळे गणेशोत्सवाचे १० दिवस हे फक्त कार्यकर्त्यांसाठीच नाही तर लालबागमधल्या प्रत्येकासाठी दिवाळीच असते. दिवाळीच्या दिवसांमध्ये असतो त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्साह गणेशोत्सवाच्या काळात बघायला मिळतो. या दिवसांमध्ये रजा मिळावी याचं नियोजन कार्यकर्ते वर्षभरापासूनच करतात. घरं स्वच्छ केली जातात, नवीन कपडे, खायला गोडधोड, पाहुण्यांचा राबता, खाण्यापीण्याची चंगळ यामुळे घरातल्या प्रत्येकाला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. त्यामुळे आम्हाला गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच आहे हे सांगताना मंडळाचे सचिव आशिष रंपुरे यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

दोन महिने आधी होती तयारीला सुरूवात दर आषाढीला तेजुकायाच्या राजाचं पाद्यपूजन होतं. गेली ५० वर्ष हा नेम कधीच चुकला नाही. पाद्यपूजन झालं की खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाच्या कामाला सुरूवात होते. तसं त्या आधीचं नियोजनाची कामं सुरूच असतात. मात्र पाद्यपूजन ही औपचारिक सुरवात मानली जाते. सजावट, रोषणाई, मिरवणूक, देखावे, नवीन काय करता येईल का याच्या आढावा बैठका सुरू होतात. कार्यकर्ते आपली सगळी कामं सांभाळून या तयारीसाठी झोकून देतात. कार्यकर्त्यांच्या टिम्स बनवून त्यांच्यावर त्या त्या विभागाची जबाबदारी टाकली जाते. प्रत्येक काम नियोजित वेळेतच पूर्ण होईल याकडे सर्वच जण लक्ष देतात. कारण गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी सर्व काम पूर्ण होईल असं नियोजन केलं जातं. याच काळात पाऊसही असल्याने त्यादृष्टीनेही तयारी करावी लागते. दहा दिवसांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो लोक येत असल्याने प्रत्येक गोष्ट चोख असावी याकडे मंडळाचं खास लक्ष असतं. अशी साकारते राजाची मूर्ती तेजुकाया सार्वजनिक उत्सव मंडळाचं सर्वात मोठं आकर्षण आहे ते राजाची उंच मूर्ती. तब्बल २२ फुटांची राजाची मूर्ती हे भाविकांचं आकर्षण आहे. आषाढीला पाद्यपूजन झाल्यानंतर मूर्ती साकारण्यास सुरवात होते. मूर्ती भव्य असल्याने ज्या ठिकाणी तिची स्थापना होते त्याच ठिकाणी ती मूर्ती साकारली जाते. अतिशय देखणी, बोलकी आणि लोभस मूर्ती घडवण्याचं काम गेल्या तीन पिढ्यांपासून एकच कुटूंबीय करत आहे. मूर्ती उंच असल्यानं प्रत्येक गोष्ट साकारताना अतिशय काळजी घ्यावी लागते. मूर्ती देखणी होत असतानाच ती मजबूत होईल याकडेही लक्ष दिलं जाते. ही मूर्ती साकारण्यासाठी एक खास प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी असल्याने दरवर्षी त्यावर मूर्ती साकारण्यास सुरूवात होते. गणेशचतुर्थिच्या काही दिवस आधी ती पूर्णपणे तयार व्हावी असं नियोजन करण्यात येतं आणि त्यानुसार काम चालतं.प्रत्येक पैशाचा चोख हिशेब १९७६ ला ट्रस्ट स्थापन करून त्याची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. असं करणारे हे पहिलच मंडळ असल्याचा दावा मंडळांच्या अध्यक्षांनी केलाय. वर्गणीपासून ते वर्षभरात राबवलेल्या विविध कामांचा चोख हिशेब मंडळाकडून ठेवला जातो. दरवर्षी हा लेखाजोखा धर्मदाय आयुक्तांना द्यावा लागत असल्याने आमच्याकडे एका पैशाचही गणित चुकत नाही असा द्यावाही त्यांनी केला. त्याचबरोबर दरवर्षी हिशेब सादर करण्यात येत असल्यानं तोच जाहीरही केला जातो. त्यामुळे मंडळाकडे आलेल्या पैशाचं आणि देणगीचं नेमकं काय होतं हेही सर्व सामान्य नागरिकांना माहिती होतं. त्यामुळं त्यांचा विश्वास आणखी दृढ होतं. भाविकांचा विश्वास हा मंडळाचं सर्वात मोठं भांडवल आहे. अनुभवी कार्यकर्त्यांची फळीमंडळाकडे पंधराशे कार्यकर्त्यांची नोंद आहे. गणेशोत्सव जस जसा जवळ येतो तसे अनेक कार्यकर्ते त्यात सामिल होतात. अनेक कार्यकर्ते अतिशय समर्पित असून दरवर्षी ते आपली सेवा मंडळाकडे देत असतात. आयटीक्षेत्रात काम करणारे नियोजन पेपरलेस कसं होईल, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता यईल याची काळजी घेतात. कॉमर्सची पार्श्वभूमी असणारे कार्यकर्ते हिशेब ठेवण्यात आणि खर्चाही व्यवस्था पाहण्यात मदत करतात. कला क्षेत्राची आवड असणारे कार्यकर्ते सजावटीत मदत करतात. पोलीस आणि इतर विभागातली मंडळी शिस्त कशी राहिल याचं नियोजन करतात. अशा प्रकारे मंडळ प्रत्येक कार्यकर्त्याची आवड आणि शक्ती पाहून त्याला त्या क्षेत्रात काम करायला प्रोत्साहन देते त्यामुळे कार्यकर्तेही घडतात आणि व्यवस्थाही उभी राहिते. एवढा मोठा उत्सव यशस्वी होण्याची हेच खरं कारण आहे.ईकोफ्रेंडली गणेशोत्सवाची तयारीराज्यात प्लास्टिक बंदी असल्याने आणि पर्यावरणाविषयी जागृती झाल्याने मंडळानेही यावर्षी गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक करण्याचा निर्णय घेतलाय. कार्यकर्त्याचा एक गट त्याची काळजी घेत असून प्रत्येक गोष्ट ही पर्यावरणालाअनुकूल कशी राहिल हे पाहिलं जात आहे. गणेशोत्सवाच्या काळातही भक्तांमध्येही याची जाणीव निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार असल्याचंही अध्यक्षांनी सांगितलंय. डेकोरेशनपासून ते प्रसादाच्या प्लेटपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकला काय पर्याय राहू शकेल याचाही विचार करण्यात येतोय. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवसगणेशोत्सव जस जसा जवळ येतो तसं कार्यकर्त्यांवरचा कामाचा दबाव वाढत जातो. गणेशोत्सवाच्या आधी सर्व तयारी पूर्ण करायची असल्यानं कार्यकर्ते दुप्पट जोमानं कामाला लागत असतात. या दहा दिवसांमध्ये मंडप हेच कार्यकर्त्यांचं घर झालेलं असतं. चोविस तास भक्तांचा ओघ सुरू असल्याने त्यांना क्षणाचीही उसंत मिळत नाही. दहा दिवसांमध्ये तर कार्यकर्त्यांना शिफ्ट मध्ये काम करावं लागतं. पोलीसांची देखरेख असली तरी कार्यकर्तेही डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत असतात. त्यामुळं त्यांच्यासाठी दिवस-रात्र यातलं अंतर मिटून जातं. अफाट गर्दी असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही महत्वाचा असतो. धार्मिक गोष्टींमध्ये लोकांच्या श्रद्धा जुळलेल्या असल्याने अतिशय काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी प्रचंड वाढते. पण सर्वांच्या सहकार्यानं फार असे समर प्रसंग कधी येत नाहीत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.मिरवणूकीचं नियोजन महत्वाचं काम तेजुकायाच्या राजाची मूर्ती २२ फूट उंच असल्यानं मिरवणूकीचं नियोजन करणं आणि ती निर्विघ्न पार पाडणं ही फार मोठी जबाबदारी असते. कार्यकर्ते खूप आधीपासून त्याची तयारी करतात. मूर्ती ज्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाते तो पोर्टेबल आणि गाड्यांना जोडता येणार आहे. पण मूर्ती सुरक्षीतपणे बाहेर काढणं. मिरवणूकीत सगळे अडथळे लक्षात घेऊन नियोजन करणं हे महत्वाचं काम असतं. ईलेक्ट्रीक वायर्स, केबल्स, पूल अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. खास कार्यकर्त्यांचा एक गट ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतो. जोपर्यंत राजा चौपाटीवर जात नाही तोपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसतो. चौपाटीवर गेल्यावर ट्रकपासून राजाचा रथ वेगळा केला जातो आणि तब्बल साडेचारशे कार्यकर्ते तो प्लॅटफॉर्म खांद्यावर घेऊन समुद्रात जातात आणि बाप्पांना तराफ्यावर विराजमान करतात. संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळातला हा सर्वात भाऊक क्षण असतो कारण राजा परतीला निघालेला असतो आणि कार्यकर्ते आपल्या लाडक्या राजाला निरोप देवून पुढच्यावर्षी लवकर या अशी घोषणा देत जड अंतकरणाने घराकडे परतत असतात.    

Trending Now