चीनमध्ये 'हा' सात वर्षांचा 'योग गुरू' महिन्याला कमावतो 10 लाख !
सुनने आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं आहे.
Sachin Salve
चीन, 21 जून : चीनमध्ये चक्क सात वर्षांचा मुलगा सर्वात लहान योग शिक्षक म्हणून प्रकाशझोतात आलाय. तो दरमहा 16,000 डॉलर म्हणजेच तब्बल 10.90 लाख रुपये कमवतोय. हो ऐकून आश्चर्य वाटलं ना! पण हे खरं आहे आणि याच कारणास्तव चीनमध्ये तो त्याच्या वयातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.चीन नॅशनल मीडिया पीपल्स डेलीनुसार, हा मुलगा प्राचीन भारतीय योगामध्ये लोकांना प्रशिक्षण देतो. या मुलाचे नाव सुन चुयांग असं असून इंग्रजीत त्याचे नाव माईक आहे. सध्या तो चीनमध्ये खूप लोकप्रिय झालेला असून, सुन चुयांगला चिनी मीडियाने या महिन्याच्या सुरूवातीला प्रकाश झोतात आणलं होतं. चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतात राहणारा हा सुन केवळ एक चीनीच नाही, तर जगातील सर्वात तरुण प्रमाणित योग शिक्षक बनला आहे. दोन वर्षाचा असताना त्याने योगाभ्यास करण्यास सुरुवात केली.
या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी, त्याच्या आईने त्याला योग सेंटरमध्ये नेलं. तो फक्त एका वर्षांच्या आतच अगदी उत्तम योगा करायला लागला. अन् तो योगात एक नैसर्गिक टॅलेंट म्हणून उदयास आला. नंतर दोन वर्षांतच त्याने ऑटिझमला मात केले.दुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यूयोगातून ऑटिझमवर मातसंशोधकांचे असं म्हणणं आहे की, काही ठराविक योग अभ्यासाने मुलांच्या ऑटिझमसारख्या आजाराला नष्ट केलं जाऊ शकतं. योगामुळे ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या चांगले विकसित होतात.चीन रेडिओ इंटरनॅशनलच्या एका अहवालात असे सांगण्यात आलं आहे की, सुनला ठीक करण्यासाठी त्याच्या आईनेदेखील योग ट्रेनिंग कोर्स केलं आहे. असं करताना, सुनने त्याच्या आईला पाहिलं अन् तोसुद्धा योगा करायला लागला. त्याच्या योगाभ्यासातून देवाची भेट झाली असल्याची भावना त्याच्या आईने व्यक्त केली. तो सतत बडबडत असतो परंतू त्याला योगा कोर्सबद्दल एकन एक गोष्ट आठवणीत आहे.
वयाच्या सहाव्या वर्षीच प्रसिद्धसहा वर्षांच्या काळात, स्पेशल टॅलेंटमुळे तो हळूहळू प्रसिद्ध होत गेला. स्थानिक योग केंद्र त्याला त्याच्या केंद्रात नियुक्त करण्यासाठी धडपड करू लागले होते. सुनने आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं आहे.योग चीनमध्ये लोकप्रिय होतंयवास्तविक 2000च्या दशकापासून चीनमध्ये योग अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. तंदुरुस्तीच्या दृष्टीमुळे चिनी लोकं योगाला पसंत करू लागले आहेत. गेल्या वर्षी सरकारने जारी केलेले संशोधन पेपर नुसार, योगा ब्लू बुक: चीन योग इंडस्ट्री डेव्हलपमेंट नुसार चीनमध्ये सध्या 10,800 नोंदणीकृत योग केंद्रे आहेत. यात लाखो लोक योग शिकत होते.
जेव्हा योगाला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखलं जात होतं तेव्हा चीनने युनायटेड नेशन्समध्ये भारताचे समर्थन केलं होतं. यावर्षी सुद्धा चीनमधील हजारो लोकांनी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त योग देखील केलं आहे.