गेल्या 20 वर्षांपासून मिरजचा जवान सैन्यदलातून बेपत्ता !

भारत मातेची सेवा करायला सैन्यदलात गेलेले मिरज तालुक्यातील करोली गावचे सुपुत्र दादासो पंडित चव्हाण गेल्या तब्बल 20 वर्षांपासून बेपत्ता आहेत.

Sachin Salve
मिलिंद पोळ, सांगली10 आॅक्टोबर : भारत मातेची सेवा करायला सैन्यदलात गेलेले मिरज तालुक्यातील करोली गावचे सुपुत्र दादासो पंडित चव्हाण गेल्या तब्बल 20 वर्षांपासून बेपत्ता आहेत. आजही त्यांच्या पत्नी भारती आणि मुलगा दीपक,वडलांची वाट पहात आहेत. चव्हाण यांना सराकरानं शोधून काढावं या मागणीबरोबरचं चव्हाणांच्या कुटुंबियाची होत असलेली आर्थिक परवड थांबावी अशी मागणी होतेय.डिसेंबर १९९७ ला जवान दादासो चव्हाण आपली सुट्टी संपवून मिरज रेल्वे स्टेशनहून आसाममध्ये सिलिगुडीला गेले. त्यांनी २७ डिसेंबर १९९७ ला पत्नी भारती चव्हाण यांना सिलीगुडी इथं सुरक्षित पोहचल्याचे पत्र पाठवलं. नंतर सुमारे वर्षभर जवान दादासो चव्हाण यांचा संपर्क घरी न झाल्यामुळे पत्नी भारती चव्हाण यांनी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाकडे धाव घेतली.

सैनिक कल्याणच्या प्रशासनाने सिलिगुडी येथील अधिकाऱ्याना संपर्क केला. सैन्यदलाकडून एक पत्र भारती चव्हाण यांना मिळालं. गंभीर बाब म्हणजे लान्स नाईक क्रमांक ६४८४०६५  दादासो चव्हाण हे सैन्यदलातून बेपत्ता आहेत असं पत्रात नमुद होतं.या पत्रामुळे भारती चव्हाणांवर दुखाचा डोंगरच कोसळला. गेले २० वर्ष पती बेपत्ता असल्यामुळे सैन्यदलाकडून त्यांना कोणत्याही सोयी-सुविधासुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे चव्हाणांच्या कुटुंबियांची आर्थिक परवड झालीये.पती बेपत्ता असल्यानं सैन्य दलाकडून ना पगार मिळतोय ना आर्थिक सोयीसुविधा... चव्हाण यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करोलीचे गावकरी करतायत.

Trending Now