...तर भारतात उपचारासाठी 'इतके' लोक घेतात कर्ज

भारताच्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला उपचारासाठी खिसे मोकळे करावे लागतात बरं इतकंच नाही तर बरं होण्यासाठी काहींना कर्जही काढावं लागतं.

Sachin Salve
07 जानेवारी : भारतात जसे आजार कमी नाही आहेत तसंच त्यांच्यावर उपचार करणंही तितकंच महाग आहे. भारताच्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला उपचारासाठी खिसे मोकळे करावे लागतात बरं इतकंच नाही तर बरं होण्यासाठी काहींना कर्जही काढावं लागतं. असा खुलासा राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षण अहवालाकडून  करण्यात आला आहे.आयुर्वेदाचा शोध लावणाऱ्या भारतात 25 टक्के ग्रामीण कुटुंब आणि 18 टक्के शहरी कुटुंब उपचारासाठी कर्ज काढतात. गंभीर आहे ना! होय पण हे खरं आहे. राष्ट्रीय आरोग्य नोंदणीमध्ये 2013-14च्या अहवालानुसार आरोग्य खर्चापैकी 64.2 टक्के खर्च हा तब्येतीवर खर्च केला जातो.अनेक सर्वेक्षणानुसार असं सांगण्यात आलं आहे की, ग्रामीण आणि शहरी लोकांचा एक मोठे वर्ग रुग्णालयांच्या उपचारासाठी आर्थिक स्रोतांचा वापर करतो. डेंटिस्ट डॉ. विपुल अरोडा यांच्यानुसार भारतात हल्ली दांताच्या आजारांवर जास्त पैसा खर्च होत नाही. पण ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लोकांना पैसे उधारही घ्यावे लागतात.

त्यातूनही डेंग्यू, मलेरिया, कुष्ठरोग, एड्स, कॅन्सर, क्षयरोग, कॉलेरा, कावीळ अशा अनेक गंभीर आजारांवर रुग्णांना खोऱ्यानं पैसा ओतावा लागतो. पण एवढं केल्यानेही रुग्ण बचावण्याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे या सगळ्यावर सरकार काही उपाययोजना काढेल का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

Trending Now