वाजपेयींच्या प्रेमाची अधुरी कहाणी...

अटल बिहारी वाजपेयी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. राजकारण, कविता, साहित्य संगीत अशा सगळ्याचं क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. त्यांच्या निखळ प्रेमाची ही अधुरी कहाणी...

नवी दिल्ली, ता.16 ऑगस्ट : अटल बिहारी वाजपेयी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. राजकारण, कविता, साहित्य संगीत अशा सगळ्याचं क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. भाजपची प्रतिमा कडवी आणि संस्कृती रक्षक पण या प्रतिमेत ते कधीच अडकले नाहीत. उत्तम खाण्यापीण्याचे ते शौकीन होते. उत्तमोत्तम कविता करणाऱ्या वाजपयींनी लग्न का केल नाही असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जात असे. मात्र त्यांनी काही मुलाखतींमध्ये त्याचं उत्तरही दिलं. पण इतर विषयांवर जसे ते फार खुलून बोलत असत तसे ते मात्र कधी बोलले नाहीत. हा प्रश्न कायम टाळण्याकडेच त्यांचा कल होता. देशाचा संसार करायचा असल्याने स्वत:च्या संसाराचा विचार करायला वेळच नाही असं त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. तुम्हा कधी प्रेम केलं का असा प्रश्न विचारला असता अशा गोष्टींवर जाहीर चर्चा करायची नसते असं सांगत त्यांनी या विषयावर बोलायचं टाळलं.पण दिल्लीच्या वर्तुळात वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांच्या मैत्रीची चर्चा होत असे. ही कहाणी सुरू झाली 40 च्या दशकात. ग्वाल्हेरमध्ये त्या काळी वाजपेयी आणि राजकुमारी कौल हे एकाच वर्गात शिकत होते. त्या काळात स्पष्टपणे बोलण्याचं अटलजींना धाडस कधी झालं नाही, शेवटी धाडस करून त्यांनी प्रेमपत्र लिहिलं. पण त्याचं उत्तर कधी त्यांना मिळालं नाही.वाजपेयींबद्दलच्या 'अशा' गोष्टी ज्या तुम्ही कधीही वाचल्या नसतील

त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती की ते प्रेम काही वर्षानंतर आपल्या आयुष्यात येणार आहे. भारतीय राजकारणातली अलिडकच्या काळातली ही सर्वात महान प्रेम कहाणी होती असं मत ज्येष्ठ पत्रकार कुलदिप नय्यर यांनी व्यक्त केलंय.नंतर दिल्लीत पुन्हा अटलजी आणि राजकुमारी कौल यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ती घट्ट होत गेली. राजकुमारी कौल आणि त्यांचे पती हे वाजपेयींच्या कुटूंबाचाच एक भाग झाले. वाजपेयी खासदार झाल्यानंतर राजकुमारी कौलही दिल्लीत आल्या होत्या.त्यांचे पती दिल्लीतल्या राजमस कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. नंतर अटलजी त्यांच्या कुटूंबातच रहायला गेले. राजकुमारी यांच्या कन्या नम्रता आणि नमीता यांना वाजपेयींनी दत्तक घेतलं होतं. नमीताने रंजन भट्टाचार्यशी लग्न केलं. नंतर रंजनही वाजपेयींसोबतच राहायला लागले. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर रंजन हे त्यांचे ओएसडी होते.मे 1994 मध्ये जेव्हा राजकुमारी कौल यांचं निधन झालं तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांच्या निधनाचं वृत्त आलं. तेव्हा पहिल्यांदाच लोकांना कळलं की त्या वाजपेयींच्या कुटूंबियांच्या घनिष्ठ सदस्य होत्या. अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना

Trending Now