ग्रामस्थांची अशीही 'गुरुदक्षिणा',वर्गशिक्षिकेला अल्टो कार भेट !

गावकरी देत असलेल्या प्रोत्साहनामुळे शिक्षक शाळेच्या नियमित वेळे व्यतिरिक्त वर्ग घेतात मेहनत घेऊन,आवडीने शिकवतात.

पुणे, 29 आॅगस्ट : शिक्षकांच्या मेहनतीला ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली तर जिल्हा परिषदेच्या शाळेतही विद्यार्थ्यांकडून चांगली शैक्षणिक कामगिरी घडू शकते याचे उदाहरण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावात घडले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील तब्बल 19 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ग्रामस्थांनी वर्गशिक्षिका ललिता धुमाळ यांना चक्क चारचाकी अल्टो कार भेट दिली.शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या गावातील विद्यार्थी पात्र ठरले तर वर्गशिक्षकाला चारचाकी भेट द्यायची प्रथा 2011 पासून खालसा ग्रामस्थानी सुरू केली. यंदा ललिता धुमाळ या मानकरी ठरल्या.गावकरी देत असलेल्या प्रोत्साहनामुळे शिक्षक शाळेच्या नियमित वेळे व्यतिरिक्त वर्ग घेतात मेहनत घेऊन,आवडीने शिकवतात.

विद्यार्थी ही चिकाटी दाखवत आहेत. गेल्या वर्षी शाळेतील 29 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवली तर यंदा 19 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.विशेष म्हणजे, ग्रामस्थानी 2 मजली शाळा बांधली,शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवले याचा परिणाम दिसू लागलाय.एकूणच शिक्षकांची मेहनत विद्यार्थ्यांची चिकाटी आणि ग्रामस्थांचे प्रोत्साहन यामुळं शिष्यवृत्ती परीक्षेत यशाचा अनोखा खालसा पॅटर्न तयार झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Trending Now