VIDEO : पुणे तिथे काय उणे,अख्खा बंगला जॅक लावून 4 फूट उचलला

2000 स्केअर फूटच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून बंगल्याची उंची चार फूट वाढवण्यात आली आहे.

पुणे, 11 जुलै : वाहनांच्या दुरुस्तीसाठी 'जॅक' लावल्याचे चित्र आपण नेहमी बघतो मात्र 2000 स्केअर फूटच्या बंगल्याला तब्बल 250 जॅक लावून बंगल्याची उंची चार फूट वाढवण्यात आली आहे. शहरातील बी. टी. कवडे रस्ता येथील तारदत्त कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या 'भारद्वाज' नावाच्या बंगल्याची उंची चार फुटाने वाढवली आहे.अकोल्यात बँकेत अग्नीतांडव, 8 ते 10 लाख रुपये जळून खाकएरवी आपली कार पंक्चर झाली तर तिला जॅक लावून उचलेले आपण अनेकदा बघितलेले आहे. मात्र तशाच पद्धतीने कुणी बंगला उचलला तर निश्चितच आश्चर्य वाटते. असाच अनुभव परिसरातील नागरिक सध्या घेताहेत. इथला अख्खा बंगला पायाला शेकडो जॅक लावून उचलला आहे.

देखभाल होत नसेल तर 'ताजमहाल' पाडून टाका, सुप्रीम कोर्टानं खडसावलंत्याचं झालं असं की, हा बंगला अनेक वर्षांपूर्वी बांधलेला होता. परिसरात विकासकामे झाली, तशी इथल्या रस्त्यांची उंचीही वाढली. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात येत होते. तब्बल दीड फूट पाणी घरात शिरल्याने बंगला मालक वैतागले. शेवटी ऑनलाईन सर्च करत असताना त्यांनी 'हाऊस लिफ्टिंग' या पर्यायाबद्दल वाचले आणि हरियाणाच्या एका ठेकेदाराला हे काम करावयास दिले.खड्ड्यात पाय घसरून तरुण पडला, ट्रकने चिरडलेपुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून त्याचा नैसर्गिक आपत्तीच्या कारणाशिवाय कोणताही धोका नाही, असा दावा ठेकेदाराने केला आहे. सुमारे 2000 स्क्वेअर फुटांच्या बंगल्याचा पाया कापून शेकडो जॅक लावून तो उचलला आणि मध्ये झालेल्या जागेत नव्याने विटा रचून त्याची उंची वाढवली. पुण्यात बहुधा  हा पहिला प्रयोग असल्याचा या टीमचा दावा आहे.

Trending Now