कोर्टाचा निर्णय 'बोनस द्या',तुकाराम मुंढे मात्र विरोधातच !

कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतलीये. औद्योगिक न्यायालयानं कामगारांच्या बाजूनं निकाल दिलाय. मात्र करारात अशी तरतूद नसल्याचं सांगत तुकाराम मुंढेंनी हात वर केलेत.

Sachin Salve
वैभव सोनवणे,पुणे10 आॅक्टोबर : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बोनसचा वाद चिघळलाय. पीएमपीएमएलच्या कामगारांना बोनस मिळणार नाही अशी भूमिका प्रशासनानं घेतलीये. तर कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतलीये. औद्योगिक न्यायालयानं कामगारांच्या बाजूनं निकाल दिलाय. मात्र करारात अशी तरतूद नसल्याचं सांगत तुकाराम मुंढेंनी हात वर केलेत.आधीच पीएमपीएमएल तोट्यात असताना कर्ज काढून सण साजरा करु नये, अशी भूमिका तुकाराम मुंढे यांनी घेतलीये.

पीएमपीएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस मिळतो. पण यावर्षी तो मिळण्याची शक्यता नाही. कारण, तोट्यातील पीएमपीएल बोनस देऊ शकत नाही. अशी मुंडे यांची भूमिका आहे. कर्मचारी संघटनांनी मात्र औद्योगिक न्यायालयात जाऊन बोनस देण्याचे आदेश आणलेत. दुसरीकडे पीएमपीएलचा संचित तोटा  343 कोटींवर पोहोचलाय आणि तो वाढतंच आहे. या दिवाळीतही बोनस दिला तर या तोट्यात 35 कोटींची भर पडेल. मागची दहा वर्षे कर्ज काढून सण साजरा करण्यासाठी बोनस दिला जातोय  पण कर्ज काही कमी होत नाही. त्यामुळे यावर्षी बोनस नाही अशी मुंढे यांची भूमिका आहे.पीएमपीएमएल कर्मचारी संख्या ही नऊ हजार इतकी आहेत त्यांना बोनस देण्यासाठी ३५ कोटी इतकी रक्कम लागणार आहे जी साधारणपणे एका महिन्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारा इतकीचं आहे त्यामुळे मुंढे  बोनस द्यायला तयार नाहीत. मुंढेंच्या या निर्णयावर कामगार संघटनांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. तिथं त्यांच्या बाजूंने निकाल लागला आहे. पण मुंढे या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार आहेत. त्यामुळे बोनससाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याच्या तयारीत कामगार संघटना आहेत.बोनस मिळवण्यासाठी कामगारांना न्यायालयीन लढ्याबरोबरच पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाकडून ही बोनस देण्याबाबत अनुकुल निर्णय होण्याची आशा आहे. पीएमपीएलच्या संचालक मंडळात दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. बोनसच्या विषयावर संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे. त्यात बहुमताने निर्णय झाला तर कामगारांना बोनस मिळू शकतो. अन्यथा बोनसचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Trending Now