'त्या' शून्य रुपये वीजबीलाचं कोडं उलगडलं, महावितरण म्हणतंय...

'सरकारी काम अन् चार महिने थांब' असं उगाच म्हटलं जात नाही पण महावितरणने तर याही पुढे जाऊन एका ग्राहकाला चांगलाच बुचकाळ्यात पाडलं.

Sachin Salve
सांगली, 04 जून : शून्य रुपयाचे वीजबील आणि 10 रुपयांचा दंड असं भन्नट वीजबील गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर व्हायरल झालं होतं. शून्य वीज बिलामुळे दहा रुपयांचा दंड कसा भरणार असा प्रश्न सर्वांचा पडला होता. पण याचा खुलासा दस्तर खुद्द महावितरणने केलाय.'सरकारी काम अन् चार महिने थांब' असं उगाच म्हटलं जात नाही पण महावितरणने तर याही पुढे जाऊन एका ग्राहकाला चांगलाच बुचकाळ्यात पाडलं. सांगलीतील राहुल वरद यांना महावितरणने शून्य वीजबिल पाठवले. आणि सात दिवसांत वीजबिल नाही भरले तर 10 रुपये दंड भरावा लागेल असं नमूद केलं. साहजिकच शून्य रुपये भरायचे कसे आणि नाही भरले तर 10 रुपयांचा दंड का भरायचा असा प्रश्न राहुल वरद यांच्यासह अख्या सोशल मीडियाकर्मींना पडला. अनेकांनी हे वीजबिल फेक असल्याचं सांगितलं. पण, हा प्रकार खरोखरचं घडला असं महावितरणनेच स्पष्ट केलं.नवीन सुधारित बिलावर देय रक्कम, दंडाची रक्कम शून्य दाखवण्यात आली असून तांत्रिक कारणांमुळे ‘शून्य’ रुपयांच्या वीजबिलास 10 रुपये दंड/विलंब आकार लागल्याचा खुलासा महावितरणने केलाय.

महावितरण म्हणतंय, राहुल वरद हे महावितरणच्या विश्रामबाग (जि. सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक 279100020747 असा आहे. मागील सहा महिन्यांपासून  वरद त्यांचे बिल आगाऊ भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारे वीज बिल येत वजा रकमेचे येत होते. मे महिन्यात त्यांना 99 युनिटच्या वीज वापरापोटी १२२२.२६ रुपये इतके वीजबिल आकारण्यात आले. परंतु वरद यांची १२२३.०८ रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीजबिलावर देय रक्कम ‘शून्य’ आली.10 रुपयांची तांत्रिक चूकचालू महिन्याचे वीजबिल आणि महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली आहे. तर चालू देयकावर सात दिवसानंतर भरावयाची रक्कम शून्य येणे अपेक्षित होते. तांत्रिक चुकीमुळे त्याठिकाणी 10 रुपये दाखविण्यात आली. त्याची दुरूस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीजबिलावर सर्व रकमा ‘शून्य’ करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत असं स्पष्टीकरण महावितरणने दिलंय.

Trending Now