कृषी यंत्रे, हिरे, जुन्या गाड्या होणार स्वस्त; जीएसटी काऊन्सिल बैठकीतले 5 ठळक मुद्दे

ज्या वस्तूंवर जीएसटी कमी करण्यात आला त्याची अंमलबजावणी येत्या 25 जानेवारीपासून लागू होणार आहे.

Sachin Salve
 18 जानेवारी : केंद्र सरकारने देशभरात एक कर अशी घोषणा करत जीएसटी लागू केला. पण वर्षभरातच त्यात दुसऱ्यांदा बदल करण्याची नामुष्की सरकारवर आलीये. आज 49 वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 54 सोई-सुविधा आणि 29 वस्तूंवर जीएसटी कमी करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. जीएसटी रिटर्न फायलिंग प्रक्रिया सोपी करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे पेट्रोलियम पदार्थ जीएसटीअंतर्गत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

1) एकूण 54 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलाय. तर 29 हस्तकलेच्या वस्तूंना थेट जीएसटीतून वगळण्यात आलंय. जीएसटीमुळे कंबरडं मोडलेल्या बांधकाम क्षेत्राबद्दल कोणताही नवा निर्णय घेण्यात आला नाही.2) सरकारने कृषी क्षेत्रातील उत्पादनावरील जीएसटी कमी केलाय. हिऱ्यावर जीएसटी 3 टक्के होता तो आता 0.2 टक्के करण्यात आलाय. सिगारेट फिल्टर राॅजवर जीएसटी 12 टक्के होता तो आता 18 टक्के करण्यात आलाय. ज्या वस्तूंवर जीएसटी कमी करण्यात आला त्याची अंमलबजावणी येत्या 25 जानेवारीपासून लागू होणार आहे. तसंच 12 राज्यात 1 फेब्रुवारीपासून ई-बिल लागू होणार आहे.3) जुन्या गाड्यांवर जीएसटी कमी करण्यात आलाय. आधी हा जीएसटी 28 टक्के होता तो आता 18 टक्के करण्यात आलाय. पेट्रोलियम क्रूड मायनिंग, ड्रिलिंग सेवेवर आता 12 टक्के जीएसटी करण्यात आलाय. तसंच नैसर्गिक गॅससाठी मायनिंग, ड्रिलिंग सेवेसाठीही 12 टक्के जीएसटी करण्यात आलाय. अॅम्बुलन्स सारख्या वाहनांचा उपयोग होणाऱ्या इतर वाहनांवर सेस रद्द करण्यात आला. जो आधी 15 टक्के होता.4) व्यवसायिक आणि उद्योजकांना सध्या 3 बी रिटर्न फाय़लिंग करावी लागते. आयटी कमिटी जीएसटीएनला सोपं करण्याबाबत या बैठकी निर्णय घेण्यात आलाय. तसंच टॅक्स चोरीवर आळा घालण्यासाठी ठोस पाऊलं उचलली जाणार आहे.5) अरुण जेटली यांनी जीएसटी गोळ्या होण्याबाबत चिंता व्यक्त केलीये. 35 हजार कोटींचा आईडीएसटी कलेक्शन राज्य आणि केंद्रात वाटला जाणार आहे. थेट कर गोळा होणे गरजेचं आहे अशी आशाही जेटलींनी व्यक्त केली.

Trending Now