Budget 2018 : 'डिजीटल' ट्रॅकवर पुन्हा रेल्वे सुसाट !

आजच्या अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पही सादर करण्यात आला. रेल्वेसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत,

Sachin Salve
01 फेब्रुवारी : आजच्या अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पही सादर करण्यात आला. रेल्वेसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, तसंच रेल्वेसंदर्भात केलेल्या घोषणावर प्रवासी नाराज आहेत की खूश आहेत याबद्दलचा  हा रिपोर्ट...सर्वसाधारण आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र सादर करण्याचं हे दुसरं वर्ष.. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासाची एक्स्प्रेस सुसाट धावणार की तिच्या वेगाला खीळ बसणार याकडे देशभरातल्या प्रवाशांचं लक्ष लागलं होतं.  तेव्हा, अर्थमंत्र्यांनी रेल्वेसंदर्भात कोणत्या मोठ्या घोषणा केल्यात त्यावर एक नजर टाकुयात.रेल्वेला काय मिळालं?

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी एकूण १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.सर्व रेल्वे स्टेशन, गाडीत वाय-फाय आणि सीसीटीव्ही सुविधा देण्याचा शब्द अरूण जेटलींनी दिलाय. देशभरातल्या ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' योजनेची घोषणा करण्यात आलीय. 25 हजार प्रवासी संख्या असलेल्या स्टेशनवर सरकते जिने सुरू करण्यात येतील मुंबई- अहमदाबाद या देशातल्या पहिल्या बुलेटच्या निर्मितीसाठी बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारण्यात येणार आहेदेशभरातल्या 36 हजार किलोमीटर लोहमार्गाचं नूतनीकरण करण्याच लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय मुंबईतल्या एकूण पायाभूत सुविधांसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.  तर मुंबई लोकलच्या वेगवेगळ्या सुविधांसाठी ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय.मुंबईतील ९० किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग बांधण्यात येतीलरेल्वेप्रमाणे विमानसेवेसाठी देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलीय.पायाभूत सुविधांसाठी कोणत्या योजना?देशभरातील 124 विमानतळांची क्षमता 5 पटींनी वाढवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय उडान योजनेंतर्गत सक्रिय नसलेली विमानतळं आणि हेलिपॅड जोडली जाणारप्रत्येक बजेटमध्ये रेल्वे आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या घोषणा केल्या जातात.मात्र त्या योजना अनेकवेळा फक्त अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या कागदावरच रेंगळतात. त्या लवकरात लवकर मार्गी लागणंही तेवढंच गरजेचं आहे.

Trending Now