पुणे, 13 जुलै : गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाचा लाडका सण! यंदा गणेशोत्सव अधिक महिन्यामुळे उशिरा असला तरी बाप्पाच्या जोरदार स्वागतासाठी लगबग सुरू झाली आहे. पुण्यामध्ये गणपतीच्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आलंय. मोठ्या कामागारांचं 70 टक्के काम पूर्ण झालं असून सिझनल मूर्ती बनवणाऱ्या कामगारांनी नुकतीच तयारीला सुरूवात केलीय. पुण्यात गेली 50 वर्ष गणेशमूर्तीची निर्मिती आणि विक्री करणारे नटराज आर्ट्सचे मालक भालचंद्र देशमुख यांनी सध्या सुरू असलेल्या तयारीबाबत माहिती सांगितली. ‘आमच्याकडं सध्या साडेचार हजार गणेशमूर्ती तयार आहे. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक रंग वापरुन घडवल्यात. सैन्यदलाकडून खास मागणी असलेल्या दगडूशेठ मूर्ती देखील इथं घडवल्या जातात. या मूर्ती परदेशातही पाठवण्यात येतात, ’ अशी माहिती देशमुख यांनी दिली.
कोणत्या मूर्तींना अधिक मागणी? ‘आमच्याकडं वर्षभर बाप्पाच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू असतं. दसऱ्यामध्ये मूर्तीकामाला सुरूवात होते, रंगपंचमीला रंगकाम सुरू होते. सध्या आमचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. पुण्यातील भाविकांना गणपतीची मूर्ती ही सर्वांगसुंदर आणि शास्त्रोक्त पद्धतीची हवी असते. मुंबईमध्ये आधुनिक प्रकारच्या मूर्ती जास्त प्रमाणावर आधुनिक पद्धतीच्या मूर्ती असतात. आमच्याकडे ‘चर्यासुटी’, ‘सोंडसुटी’, ‘आसनमांडी’, ‘मूषक’ अशा शास्त्रोक्त पद्धतीच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. याबरोबरच म्हैसुरी पध्दतीच्या गणपतीच्या मूर्तीसुद्धा उपलब्ध आहेत. सध्या ग्राहकांकडून वातावरणाशी सुसंगत अशा मूर्तींची मागणी आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक रंग वापरण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या इथे १०% मूर्ती या शाडूच्या आहेत. 1000 रुपयांचं फेस मसाजर फक्त 200 रुपयांना, मेकअपचं इतकं स्वस्त साहित्य कुठे पाहिलंय का? ‘दगडूशेठ’ आणि ‘लालबागचा राजा’ या मूर्ती एव्हरग्रीन आहेत आणि याच मूर्ती ग्राहकांकडून जास्त प्रमाणात घेतल्या जातात. यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आम्ही 9 देशांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापनेसाठी पाठवलेल्या आहेत. विनामूल्य सेवेद्वारे आपल्या गणेशोत्सवाचा आणि संस्कृतीचा प्रसार व्हावा हा आमचा प्रयत्न आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.