पुण्यात पतंगाचा चिनी मांजा गळ्याभोवती अडकून एका महिलेचा मृत्यू

सुवर्णा मुजुमदार असं या मृत महिलेचं नाव असून त्या सकाळ वर्तमानपत्राच्या जाहिरात आणि मार्केटिंग विभागात काम करायच्या.

Sonali Deshpande | News18 Lokmat
पुणे, 11फेब्रुवारी : पुण्यात पतंगाचा चिनी मांजा गळ्याभोवती अडकल्याची घटना घडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय. सुवर्णा मुजुमदार असं या मृत महिलेचं नाव असून त्या सकाळ वर्तमानपत्राच्या जाहिरात आणि मार्केटिंग विभागात काम करायच्या.बुधवारी सायंकाळच्या सुमारास शिवाजी पुलावरून दुचाकीवरून जाताना पतंगाचा मांजा गळ्याभोवती गुंडाळला गेल्याने त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चिनी मांज्यावर बंदी असूनही याचा सर्रास वापर केला जातो. या मांज्याच्या बंदीचीही मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात येतीय.पतंग उडवताना काही हौशी तरुणांकडून नायलॉनचा चिनी मांजा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या नायलॉनच्या मांजामुळे लहान मुलांसह दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. या मांजाने लहान मुले आणि दुचाकीस्वारांचे हात आणि गळा चिरल्याच्या घटना घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजा उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. शहर पोलीस या पतंग विक्रेत्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.

Trending Now