JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Maharashtra Politics : 'पुण्यातील या जागेसाठी आता दादांकडे मागणी करणार' चाकणकर यांचा मोठा दावा

Maharashtra Politics : 'पुण्यातील या जागेसाठी आता दादांकडे मागणी करणार' चाकणकर यांचा मोठा दावा

Maharashtra Politics : शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात दाखल होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष झालेल्या रूपाली चाकणकर यांच पुण्यात जोरदार स्वागत झालं.

जाहिरात

(रुपाली चाकणकर)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 08 जुलै : ‘15 महिन्याचा कालावधी माझ्यासाठी सल देणारा होता. अजितदादांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. 15 महिन्यामध्ये मला पक्षाच्या व्यासपीठावर येऊ दिलं नाही. खडकवासला मतदारसंघावर माझा दावा कायम आहे, मी अजित पवारांकडे याबाबत मागणी करणार आहे, असं म्हणत अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात दाखल होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष झालेल्या रूपाली चाकणकर यांच पुण्यात जोरदार स्वागत झालं. पुण्यात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदन साठी गर्दी केली होती. यावेळी, रूपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदार संघातील उमेदवारी वरील दावा कायम ठेवला आहे. आधी साहेबांकडे उमेदवारी मागितली आता दादांकडे मागणार असं सांगत त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.

‘मी पक्षातील राजकारण दादांना भेटून वेळोवेळी सांगितल्या. पक्षातील महिला सोडून जाव्या अशी परिस्थिती निर्माण केली जात होती. पक्षातील महिलांचा जो टक्का वाढत आहे तो दादांमुळे वाढला आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. मी जेव्हा मतदारसंघाबद्दल उमेदवारी मागितली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. मी संघटनेच्या माध्यमातून आयोगाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचली. आधी मी साहेबांकडे उमेदवारी मागितली होती. आता दादांकडे ही उमेदवारी मागणार आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं. (Sharad Pawar : ‘पवार बाबा की जय’.. चिमुकल्यालाही शरद पवारांची भुरळ; Video कॉल तुफान व्हायरल) चित्रा वाघ यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. पण तो फोटो 10 वर्षांपूर्वीचा आहे. त्यानंतर आम्ही कधीही बोललो नाही. फोटो व्हायरल करून TRP वाढत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा खुलासाही चाकणकर यांनी केला. ( ‘आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर…’ शरद पवारांचे थेट PM मोदींना आवाहन ) ‘शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी आम्ही कायम राहणार आहोत. महाविकास आघाडीत असताना आमच्यासोबत शिवसेना होती, मग आता भाजप आलं तर काय अडचण आहे, असंही चाकणकर म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या