इतके मतभेद असलेलं सरकार काय कामाचं?- सुप्रिया सुळे

पुण्यात सुप्रिया सुळे कामगार आयुक्त कार्यालयात धरणं आंदोलनाला बसल्या आहेत. नीमकामगार भरती बंद करा, कामगार विरोधी धोरण आणि उद्योगपती धार्जिणं धोरण बदला अशी त्यांची मागणी आहे.

Sonali Deshpande
पुणे, 04 आॅक्टोबर : पुण्यात सुप्रिया सुळे कामगार आयुक्त कार्यालयात धरणं आंदोलनाला बसल्या आहेत. नीमकामगार भरती बंद करा, कामगार विरोधी धोरण आणि उद्योगपती धार्जिणं धोरण बदला अशी त्यांची मागणी आहे.यावेळी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणासोबत जाणार, आघाडी करणार का, असं विचारलं असता, पवारसाहेबांनी भाषणातच त्याचं उत्तर दिल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पृथ्वीराज चव्हाण हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण समविचारी पक्षासोबतच जाण्याबद्दलची माझी तरी भूमिका रेकॉर्डवर आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.या सरकारमध्ये भाजप आणि सेनेचं रिलेशनशिप काय ते मला जज करता येत नाही, पण इतके मतभेद असलेलं सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याचे परिणाम स्पष्ट दिसताहेत,अशी टीकाही त्यांनी केली.

Trending Now