पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय, दिसेल त्याला चावा घेणाऱ्या अनेक कुत्र्यांमुळे पिंपरीच्या नागरिकांमध्ये भीती पसरलीय.

Sonali Deshpande
पिंपरी, 23 जानेवारी : पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय, दिसेल त्याला चावा घेणाऱ्या अनेक कुत्र्यांमुळे पिंपरीच्या नागरिकांमध्ये भीती पसरलीय. आज सकाळी चिंचवड गावातील केशवनगर परिसरात झालेला अशाच एका घटनेत, कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चार नागरिक गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.वारंवार घडणाऱ्या ह्या घटनांमुळे माॅर्निंग वॉकला जाणारे नागरिक, त्याचबरोबर शाळेत जाणारे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन चालतायत आणि महापालिका प्रशासनाचा मात्र ह्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसतंय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय.

Trending Now