पतंगाच्या मांज्यामुळे चिमुकल्याचा डोळा जायबंदी

पतंगाच्या मांज्यामुळे अनेक वेळा पक्षी आणि मुके प्राणी जखमी झाल्याचं आपण बघितला असेल, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर मांजा गुंडाळला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

Sonali Deshpande
10 जानेवारी : पतंगाच्या  मांज्यामुळे अनेक वेळा पक्षी आणि मुके प्राणी जखमी झाल्याचं आपण बघितला असेल, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर मांजा गुंडाळला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.हमजा खान असं ह्या चिमुकल्याचं नाव असून, मांज्यामुळे त्याच्या डोळ्यांना झालेल्या इजांवर शस्त्रक्रिया केली गेलीय आणि आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय, चिमुकला हमजा त्याच्या पालकासोबत दुचाकीच्या समोर बसून प्रवास करत होता , त्यावेळी हवेत तरंगणारा मांजा अचानक त्याच्या चेहऱ्याभोवती गुंडाळल्या गेला, आणि काही कळण्या आधीच त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला, ही बाब लक्षात येताच तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.त्यामुळे आता तरी ह्या जीवघेण्या मांज्यावर बंदी घालण्याची मागणी डॉक्टर आणि ह्या जखमी मुलाच्या नातेवाईकांनी केलीये.

Trending Now