पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी होणार, नीलम गोऱ्हेंचा सवाल

पत्रकार संरक्षण कायद्यासदर्भात सह्या झाल्या, धोरणं झाली मात्र या कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही.

Renuka Dhaybar
01 मे : पत्रकार संरक्षण कायद्यासदर्भात सह्या झाल्या, धोरणं झाली मात्र या कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत ते यात लक्ष घालतायत, असा टोमणा शिवसेना आमदार नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.पत्रकारांना आजारपण, अपघात, अप्रिय बातमी दिल्यानं कमी करणे अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही असंही त्या म्हणाल्या.दरम्यान, शिक्षण क्षेत्रात बदल होणं अवघड आहे. अनेक लक्षवेधी मांडल्या पण आता शिक्षणमंत्री नाहीतर सरकार बदलण्याची गरज असल्याचं मत आमदार नीलम गोऱ्हे यांनी मांडलं आहे. वरुणराजा भिडे पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Trending Now