कठड्याला धडकून कार कोसळली पाण्यात, कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

पुण्याच्या फुरसुंगीयेथील सोनार पुलावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

पुणे, 12 ऑगस्ट : पुण्याच्या फुरसुंगीयेथील सोनार पुलावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या पहारी एक सॅन्ट्रो कार पुलावरून चालली होती. आणि पुलाजवळ असलेल्या कठड्याला कार ध़कली आणि सरळ कठडा तोडून गाडी पुलाखालील पाण्यात कोसळली. या कार अपघातात कारमध्ये असलेल्या कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद तर ४ जखमीहा अपघात घडताच स्थानिकांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. त्याचबरोबर नितीन कुंभार या कराटे परिक्षकाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार नितीन कुंभार हे एंजल हायस्कुल लोणीकाळभोर इथं कराटे प्रशिक्षक होते.

नितीन कुंभार यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ते शिकवत असलेल्या शाळेतही शोककळा पसरली आहे.हेही वाचा...PHOTOS : राज ठाकरेंपासून ते सलमानपर्यंत सर्वांनीच सिंग्नल तोडला,दंडही भरला नाही!आरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारणVIDEO : तरुणींच्या दोन गटात भररस्त्यावर तुफान मारामारी

Trending Now