रोहित पवार
पुणे, 3 जुलै : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बंड केलं. त्यांनी रविवारी भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, याची कल्पना होती. मात्र अजित पवार भाजपसोबत जातील असं कधीही वाटलं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं रोहित पवार यांनी? महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोनच मोठे पक्ष आपल्याला राज्यात टक्कर देऊ शकतात हे भाजपला माहीत होतं म्हणून त्यांनी पक्ष फोडला. भाजप राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, हे माहिती होतं मात्र अजित पवार हे भाजपसोबत जातील असं कधीही वाटलं नाही. लढणं आमच्या रक्तातच आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
Maharashta Politics : राष्ट्रवादीतील भूकंपानंतर नागपूरकरांची फडणवीसांना नवी उपाधी; जिल्हाभर लागले होर्डिंग्ज!शरद पवार मैदानात दुसरीकडे आता शरद पवार देखील मैदानात उतरले आहेत. शरद पवार हे आज कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते कराडमध्ये येत आहेत. आज शरद पवार यांच्यासोबत कोणते नेते असणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.