पिंपरी चिंचवडमधल्या चोरांचा नेम नाही; चोरले कपडे आणि भाजीपाला

वारंवार होणाऱ्या चोरीमुळे एका भाजी विक्रेत्यानं सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

Renuka Dhaybar
08 फेब्रुवीरी : चोर नेमकी कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही, पिंपरी चिंचवड मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. इथल्या भुरट्या चोरट्यांनी चक्क भाजी पाल्यावर डल्ला मारला आहे. शहरातील वाकड परिसरात असलेल्या यमुना नगरमध्ये घडलेल्या या प्रकाराची सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.वारंवार होणाऱ्या चोरीमुळे एका भाजी विक्रेत्यानं सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे वाकड पोलीस स्टेशन समोरच हा सगळा प्रकार घडलाय. पण पोलिसांना चोरी होताना का दिसली नाही. हा मोठा प्रश्नच आहे.या परिसरातल्या या भुरट्या चोरांकडून केवळ भाजी-पालाच नाही तर कोंबड्या, बकरी, इतकंच काय तर वाळत घातलेली कपडेही लंपास केली जातायत. पण तरीही त्यांना पकडण्यात पोलीस अपयशी आहेत. आणि हे चोर मात्र मोकाट आहेत.

त्यामुळे अशा चोरांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या सीसीटीव्हीच्या मदतीने तरी पोलीस कारवाई करून या भामट्या चोरांवर कारवाई करतील का? याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

Trending Now