अजब ! स्लीपर-शॉर्ट्स घातल्यामुळे पुण्याच्या 'या' हॉटेलमधून काढलं बाहेर

अहो, हे पुणेकर इतके भयंकर आहेत की त्यांनी चक्क स्लीपर आणि शॉर्ट्स घातल्यामुळे एका एजंटला हॉटेलच्या बाहेर हकलून दिलं.

पुणे, 11 जुलै : 'पुणे तिथे काय ऊणे' ही म्हण पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कारण आहे पुण्याच्या स्पष्ट आणि ठळकपणे मुद्दे मांडणाऱ्या पाट्या. अहो, हे पुणेकर इतके भयंकर आहेत की त्यांनी चक्क स्लीपर आणि शॉर्ट्स घातल्यामुळे एका एजंटला हॉटेलच्या बाहेर हकलून दिलं.ते झालं असं की, पुण्यात एका आयटी कंपनीत कामाला असणारे काही संगणक अभियंते सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवर्समधील 'एजंट जॅक' या हॉटेलात जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी पायामध्ये स्लीपर आणि अंगात शॉर्ट्स घातल्याचे कारण पुढे करून सर्वजणांना हॉटेल व्यवस्थापनाने चक्क प्रवेश नाकारला आणि त्यांना हॉटेलच्या बाहेर काढण्यात आलं.

लाखो रुपये कमवण्याचा सोपा उपाय, नोकरी सोडून करा हे काम !

या मुद्द्यावरून त्यांनी हॉटेलच्या संचालकांशी संवाद साधला असता त्यांनी रिसेप्शन लॉबीमध्ये लिहिलेल्या नियमावलीकडे बोट दाखवलं. एवढेच नाही तर 'तुमचा अपिरियन्स या हॉटेलमधील कोणतीही सेवा घेण्यास योग्य नाही' असंही आम्हाला सांगण्यात आल्याचा आरोप या संगणक अभियंत्यांनी केला आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गोव्याचं सरकार 'व्हेंटिलेटर'वर, पर्रीकरांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी !

विशेष म्हणजे हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या नियमावलीमधील अनेक नियमांपैकी असाही एक नियम लिहिला आहे की या ठिकाणी बॉलिवूडमधील हिंदी गाणी वाजवली जात नाहीत. बार आणि रेस्टॉरंट परिसरात डान्स करण्यासाठी मनाई आहे.

हेही वाचा...

महात्मा गांधींच्या विद्यापीठातच होतेय हिंसा, पाच मुलींना केले निलंबित

जपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार

या अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट

Trending Now