पुण्यात तिहेरी हत्याकांड; तिघांचा खून करून मृतदेह फेकले नाल्यात

यातील एक मृतदेह 15-16 वर्षाच्या मुलाचा आहे. या तिघांचा खून करून त्यांचे मृतदेह गणेश पेठ नाल्यात टाकून दिले होते.

Renuka Dhaybar
पुणे, 24 फेब्रुवारी : पुण्याच्या सोमवार पेठ पोलीस चौकीसमोरील नागझरी नाल्यामध्ये काल संध्याकाळी तीन मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. यातील एक मृतदेह 15-16 वर्षाच्या मुलाचा आहे. या तिघांचा खून करून त्यांचे मृतदेह गणेश पेठ नाल्यात टाकून दिले होते.कचरा गोळा करणाऱ्या दोन गटांतील भांडणामुळे हे तिहेरी हत्याकांड उघडकीस आलं आहे. दरम्यान यात 2 आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात सध्या भितीचं वातावरण पहायला मिळतंय. या तीन मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये असलेल्या लहान मुलाचं नाव नावेद आहे तर दुस-या मृत व्यक्तीचे नाव संदीप अवसरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संशयित आरोपी बाप्या उर्फ रवींद्र जगन सोनवणे आणि विक्रम दीपकसिंग परदेशी यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा संशयित आरोपी मुन्ना भंगारवाला फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Trending Now