ऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल !

13 ऑगस्ट : राजाराम पुलावरून म्हात्रे पुलाकडे जाताना वळणावर रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे. सध्या डीपी रस्त्याचं काँक्रिटिकरणाचं काम सुरू आहे. या भागातील आधीच्या डांबरी रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे आता दुरूस्ती होईपर्यंत वाहनचालकांची तारांबळ उडणार असल्याचं चित्र निर्माण झालंय.

या भागात मात्र अजून हे काम व्हायचं आहे पण आधीच्या डांबरी रस्त्याला तडे गेले आहेत संबंधित वार्डातील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पालिकेचे लक्ष वेधले होते
2 दिवसानंतर अधिकारी जागे झालेत. आता दुरुस्ती होईपर्यंत वाहनचालकांची तारांबळ उडणार आहे.

Trending Now