प्लास्टिक उठलं बैलाच्या जीवावर, पोटातून काढलं 85 किलो प्लास्टिक

प्लास्टिक बंदी नंतरही तुम्ही प्लास्टिकचा वापर करणं सोडलं नसेल तर, ही बातमी वाचून तुमचे डोळे नक्की उघडतील.

Renuka Dhaybar
पुणे, ता. 25 मे : प्लास्टिक बंदी नंतरही तुम्ही प्लास्टिकचा वापर करणं सोडलं नसेल तर, ही बातमी वाचून तुमचे डोळे नक्की उघडतील. लोकहो आपण वापर करून जे प्लास्टिक रस्त्यावर फेकतो त्यामुळे पर्यावरणाचा तर ऱ्हास होतोच, त्याच बरोबर ते प्लास्टिक मुक्या जनावरांच्या मृत्यसाठीही कारणीभुत ठरतं आहे.प्लास्टिक, म्हणजेच मृत्यु ! हे तुम्हाला सांगून पटत नसेल तर ही सर्जरी बघाच, एका जीवंत नंदीच्या पोटातून थो थोडके नाही तर तब्बल 85 किलो प्लास्टिक बाहेर काढलं जातंय. एवढं प्लास्टिक पोटात साचल्यानं हा नंदी ना खाऊ शकत होता ना फिरू शकत होता. पण त्याचं ऑपरेशन करुन त्याच्या पोटातून 85 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आलं आहे.

पण डॉक्टर चेतन आणि त्यांच्या टीमने आपल्या रेसक्यू चैरिटेबल ट्रस्ट मार्फत अशा भटक्या जनावरांच संगोपन करायच ठरवलं. आणि त्यांच्या या मोहीमेतून प्लास्टिकची ही धक्कादायक बाब समोर आली आहे.महिन्याला अशा 6 ते 7 सर्जरी करून ते मुक्या प्राण्यांना वाचविन्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सारखं काम तर आपण करणार नाही पण त्यांच्या या कामाला हातभार म्हणून तरी प्लास्टिकचा वापर टाळा आणि प्लास्टिक इतरत्र कुठेही फेकू नका.

Trending Now