पुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद

पुण्यात गुन्हे शाखेनं तब्बल 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर धाडी टाकल्या आहेत.

पुणे, 12 ऑगस्ट : पुण्यात गुन्हे शाखेनं तब्बल 12 नामांकित स्टार हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर धाडी टाकल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी 6 ते 7 हजार तरुण-तरुणी या ठिकाणी आढळून आलेत. या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पहिल्यांदाच हुक्का पार्लरवर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई काल(शनिवार)रात्री एक ते आज रविवार पहाटे चार या कालावधीत करण्यात आली. या हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात मोठ्या प्रमाणात तरूणाई असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्याची तरूणाई कोणत्या मार्गावर भरकटत चालली आहे याचा अंदाज तुम्हा सगळ्यांना आलाच असेल.गेल्या काही दिवसांआधी नवी मुबंईतही असेच 4 मोठ्या बारवर छापे टाकण्यात आले. यात तब्बल 38 बारबालांना अश्लील चाळे करताना ताब्यात घेण्यात आलं. नवी मुंबईत नवनियुक्त झालेले पोलीस आयुक्त संजय यादव यांनी ही मोठी कारवाई केली होती. यातही तरूणाईचा मोठा सहभाग पहायला मिळाला.

Trending Now