विघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला - डीएसके

'मला खोट्या गुन्ह्यांखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय' असा आरोप डी एस कुलकर्णी यांनी पत्राद्वारे केला आहे.

Sachin Salve
04 जानेवारी : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना काल पुण्याच्या सेशन कोर्टानं 2 प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर आज डीएसकेंनी एक नवा दावा केला आहे. 'मला खोट्या गुन्ह्यांखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय' असा आरोप डी एस कुलकर्णी यांनी पत्राद्वारे केला आहे. 'विघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला' असंही त्यांनी या पत्रात लिहलं आहे.फ्लॅट धारकांनी मोफा अंतर्गत याचिका दाखल केली होती म्हणून पुण्याच्या सेशन कोर्टाने डीएसकेंना दोन प्रकरणांत जामीन दिला होता.  डीएसकेंचं दुसरं प्रकरण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात होतं. या प्रकरणातही त्यांना जामीन देण्यात आला. त्यामुळे मी दोषी नाही माझ्यावर प्रेम करणारी असंख्य जनता आहे असंही  डीएसके यांनी पत्रात म्हटलं आहे.डीएसके यांचं पत्र...

-डी. एस. कुलकर्णी

Trending Now