प्रतिकात्मक फोटो
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 3 जुलै : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने भारतात 15 ऑनलाईन तरुणी सोडल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून देशातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवण्यासाठी पाकिस्तानने सोडल्या भारतामध्ये 15 ते 16 ऑनलाईन हेरगिरी करणाऱ्या तरुणी सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे देशभरातील सर्वच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकासह अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनोळखी सौंदर्यवती महिलांचे फेसबुक फ्रेंड request न स्वीकारण्याचे आदेश सरकारने आदेश दिले आहेत. पुण्यातील डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी तरुणी झारादास गुप्ता हिच्या प्रेमाच्या आणि हनीट्रॅपमध्ये अडकला. यानंतर देशातील संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्यानंतर भारतात हाय अलर्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील रहिवासी असलेल्या सुंदर तरुणी देशातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना फेसबुक आणि इतर सोशल माध्यमातून संपर्क साधून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाहत आहेत. पाकिस्तानी सोडलेल्या त्या चौदा सौंदर्य तरुणींपैकी झारा दास गुप्ताही त्यातीलच एक आहे. याच झारादास गुप्ताच्या गळाला अडकून भारतातील महत्त्वाची माहिती प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला पुरवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील आयएएस. आयपीएस आणि इतर अति महत्त्वाच्या व्यक्तींना सोशल माध्यमातून तरुणांनी पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.