चिमुकल्यालाही शरद पवारांची भुरळ
रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 8 जुलै : अजित पवार यांनी समर्थक आमदारांसोबत बंडखोरी केल्याने राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात शरद पवार यांनी येवला येथून केली आहे. यावेळी प्रवासादरम्याचा शरद पवार यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे व्हिडीओत? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर असताना खासदार अमोल कोल्हे यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील काही नागरिकांना व्हिडिओ कॉलद्वारे शरद पवार यांच्यासोबत संवाद घडवला. यावेळी मंचर जवळच्या निघोटवाडी येथील एका वृद्ध आजीबाईने आपुलकीने शरद पवारांना तब्बेतीची विचारपुस करत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला. यावेळी या आजीच्या चिमुकल्या नातवानेही शरद पवारांशी संवाद साधव ‘पवार बाबा की जय’च्या घोषणा दिल्या. या कुटुंबासोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत असुन या संवादाची सर्वत्र चर्चा पाहावयास मिळत आहे.
काय म्हणाले शरद पवार? दुष्काळी भागातला आपला शेतकरी असेल, सहकारी असेल त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यामुळे असा विचार केला, दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांनी आम्ही जनतेच्या समोर सादर केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचे असेल तर भक्कम विश्वास दाखवायचा असेल तर येवल्याची निवड केली. काही जणांनी सांगितलं, पवारांनी नाव दिलं आम्ही निवडून दिलं, एकदा दोनदा आणि तीन वेळा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. त्यासाठी आम्ही इथं आलोय, कुणाचं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही, मी यासाठी माफी मागण्यासाठी आलोय, माझा अंदाज कधी चुकूत नाही, इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारांवर तुम्ही निकाल दिले, त्यावर तुम्हालाही यातना झाल्या. तुम्हाला माझ्या निर्णयामुळे वेदना झाल्या असतील तर माझं कर्तव्य झालं आहे, मी माफी मागितली पाहिजे. कधी कधी लोकांच्या समोर येण्याची वेळ येईल. आज येईल, उद्या येईल, वर्षभराने येईल, पण पुन्हा चूक करणार नाही. योग्य निकालाचा निकाल सांगेन. वाचा - ‘आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर…’ शरद पवारांचे थेट PM मोदींना आवाहन गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे, उद्योग धंद्याचा प्रश्न आहे, कांद्याच्या प्रश्न आहे. राजकारण कशासाठी करायचं, राजकारण यासाठी करायचं, सामान्य माणसाचे प्रश्न सोडायचे यासाठी राजकारण करायचं हे आम्ही केलं. या मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामात तात्या टोप्यांनी ऐतिहासिक काम केलं. त्यांची ही भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीत हा जिल्हा कायम अग्रभागी राहिला. पण देशात कधी परकीयांच्या हातात जाऊ दिला नाही, यासाठी जनतेनं काम केलं. म्हणून त्यांनी कधी स्वाभिमान सोडला नाही. पंतप्रधान मोदींना आवाहन आज खऱ्या अर्थानं शक्ती देण्याची गरज आहे, त्यासाठी इथं आलो आहोत. मध्यंतरी 10 ते 12 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. त्यांनी भाषणात सांगितलं की, काँग्रेस पक्षावर हल्ला केला. त्यांच्यावर आरोप केले. हे करत असताना राष्ट्रवादीवर टीका केली. एक दोन उदाहरणं सांगितली. जे त्यांनी आरोप केले. ते आरोप भ्रष्टाचाराचे असतील, राज्याच्या गोष्ट मांडल्या असतील, माझं पंतप्रधान मोदींना सांगणं आहे, जर आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर असेल नसेल ती सत्ता वापरा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा, सखोल प्रकरणात जा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेला असेल पाहिजे ती सजा द्या, आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा असेल. आज मी अधिक बोलण्यासाठी इथं उभा नाही. इथं काही व्यक्तिगत बोलणार नाही. एकच भावना माझ्या मनात आहे, नाशिक पुढे जात आहे. येवला मागे आहे, येवला पुढे नेण्यासाठी काम करेन.