पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास

पिंपरी चिंचवड शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या मोशी कचरा डेपोला काल रात्री भीषण आग लागली.

Renuka Dhaybar
30 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या मोशी कचरा डेपोला काल रात्री भीषण आग लागली. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र ही आग कचऱ्याला लागलेली असल्या कारणाने अजुनही धुमसतीय आहे. आणि त्यामुळे सध्या परिसरात कूलिंगच काम सुरु आहे.काल रात्री लागलेल्या या आगीत शेकडो टन कचरा जळल्यामुळे निर्माण झालेल्या धुराचा आजु बाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. या कचरा डेपोला आग लागण्याची ही पहिलीच घटना असल्याने, एवढी मोठी आग विझवतना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.तब्बल 7 तासांच्या प्रयत्नानंतर या भीषण आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. आगीच्या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिकेचे महापौर नितिन काळजे यांनी दिले आहेत. तर आमदार महेश लांडगे आणि इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तात्काळ मदत करत, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Trending Now