चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू

पुणे, 30 जुलै : गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेलं मराठा मोर्चा आंदोलन आता हाताबाहेर गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. तर 25 पेक्षा जास्त गाड्या पोलिसांकडून जाळण्यात आल्या आहे. पुण्यातल्या चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. हंडेवाडी परिसरात आंदोलकांनी टायर्स जाळून रास्ता रोको केला आहे. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलकांनी तीव्रं आंदोलन चिघळवलं आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

पुणे, 30 जुलै : पुण्यातल्या चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता असून, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेलं मराठा मोर्चा आंदोलन आता हाताबाहेर गेलं असून, पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी सोमवारी जबरदस्त तोडफोड केली. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या, तर 25 पेक्षा जास्त गाड्या पोलिसांच्या जाळल्या. हिंसक वळण लागलेल्या पुण्यातल्या चाकण परिसरात तणावपूर्ण शांतता असून, जमावबंदी लागू करण्यात आली आहे.आंदोलकांनी तळेगाव चौकात दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. हंडेवाडी परिसरात आंदोलकांनी टायर्स जाळून रास्ता रोको केला आहे. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलकांनी तीव्रं आंदोलन चिघळवलं आहे.

Trending Now