चाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या

पुणे, 30 जुलै : गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेलं मराठा मोर्चा आंदोलन आता हाताबाहेर गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. 8 पेक्षा अधिक गाड्या पेटवल्या आहेत. हंडेवाडी परिसरात आंदोलकांनी टायर्स जाळून रास्ता रोको केला आहे. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलकांनी तीव्रं आंदोलन चिघळवलं आहे. 4 तासांपासून आंदोलन सुरू आहे. पोलीस आंदोलन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी धुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now