आजारी असल्याचा बहाणा करत मदत मागायचा, गाडीवर मागे बसून १८ तरुणींचा विनयभंग
चंद्रकांत फुंदे, पुणे, 14 जुलै : पुण्यात एका व्यक्तीने अजारी असल्याचा बहाणा करून दुचाकीवरून दवाखान्यात सोडण्याची विनंती करत तरुणीचां विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 44 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तो आजारी असल्याचं सांगत दुचाकीवरून दवाखान्यात सोडा अशी विनंती तरुणींना करायचा. त्यानंतर गाडीवर मागे बसून तरुणींशी अश्लील चाळे करत होता. चतु:श्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी अनुप वाणीला अटक केलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, 6 जुलै रोजी तरुणी आणि तिची मैत्रीण रात्री 10 च्या सुमारास सेनापती बापट रोडने जात होत्या. तेव्हा आरोपी दुचाकीवरून आला आणि मला चक्कर येतेय, दुचाकीवरून पुढे सोडा असं सांगितलं. तेव्हा तरुणीने त्याला मदत करण्यासाठी आरोपीला गाडीवर बसवलं आणि सोडायला निघाली. थोडं अंतर जाताच आरोपीने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. धबधबा बघायला गेल्यावर नदीत उतरला, अंदाज चुकला अन् बुडाला; तरुणाचा मृत्यू तरुणीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने ऐकले नाही. शेवटी तिने गाडी थांबवून मुलांकडून मदत मागितली. तोपर्यंत तरुणीची मैत्रिण तिथे पोहोचल्याने आरोपी गाडीसह पळून गेला. पीडित मुलीने सीपींनी महिला सुरक्षासंदर्भात दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरून रिसतर तक्रार करताच पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही तपासून या नराधमाला जेरबंद केलंय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक अशी माहिती समोर आली. मी आजारी आहे, गाडी चालवता येत नाही असा बहाणा करून कॉलेज तरुणींकडे आरोपी मदत मागायचा. त्यानंतर दवाखान्यात सोडा म्हणत तरुणींना दुचाकी चालवायला देऊन आपण मागे बसायचा आणि तरुणींशी अश्लील चाळे करत असे. त्याने अशाप्रकारचे पाच गुन्हे केल्याचं पोलीस रेकॉर्डवर आढळून आलंय. पण अशाप्रकारचे किमान 18 गुन्हे केल्याचं पोलीस चौकशीत कबुल केलंय. त्यामुळे पीडितांनी न भिता समोर येऊन तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय.