JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पहिली टर्म गमावली, आता पार्थ पवारांना येणार का अच्छे दिन? नेत्यांच्या मागणीने चर्चाला उधाण

पहिली टर्म गमावली, आता पार्थ पवारांना येणार का अच्छे दिन? नेत्यांच्या मागणीने चर्चाला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यावर आता पुणे जिल्ह्यात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात

पार्थ पवार आणि अजित पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 6 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतली. यानंतर सगळ्यात आधी राष्ट्रवादी पक्षावर आपली पकड मजबूत करायला सुरवात केली आहे.तर तिकडे बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील अजित दादांच्या समर्थकांनी आता पार्थ पवारांच्या नेतृत्वाची मागणी करत नव्याच राजकीय समीकरणाची जुळवा जुळव करायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच फटाके उडवत आणि एकमेकांना पेढे भरवत पिंपरी चिंचवडमधील दादांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. राज्यातील सधन महापालिका अशी ओळख असलेल्या या महापालिकेवर सलग 15 वर्षाहून अधिक काळ एक हाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता. मात्र, भाजपने हा गड काबीज केला आणि राष्ट्रवादी पक्षाला उतरती कळा लागली. हातातील महापालिका हातची गेल्यानंतर पाठोपाठ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी पक्ष तोंडावर आपटला. मात्र, पक्षाला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव सगळ्यात जिव्हारी लागला. त्यामुळेच आता महापालिका आणि विधानसभाच नाहीतर पार्थ पवारांच्या नेतृत्वात लोकसभादेखील लढविण्याची इच्छा व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी आपली इच्छा स्पष्ट केली. पिंपरी चिंचवड मधील दादा समर्थकांचा रोख हा मावळ लोकसभा मतदार संघावर आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासून तयारी केल्यास अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार निवडून येऊ शकतात, असा विश्वास इथल्या नेत्यांना वाटतो. असा विश्वास वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे, मावळ लोकभेचा खासदार नेहमी घाटावरचे म्हणजे मावळ, पिंपरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मतांवरच निवडून येतो, हा आजवरचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे पिंपरी महापालिका ताब्यात आल्यास मावळ लोकसभेत पार्थ पवारांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते, अशी गणिते मांडली जात आहेत. मात्र, मावळ लोकसभा हा पारंपरिक रित्या शिवसेनेच्या गड राहिला आहे. त्यामुळे इथला मतदार केवळ शिवसनेचाच उमेदवार निवडून देणार, असा विश्वास व्यक्त करत आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मावळचा उमेदवार आपणच असू, असा दावा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केला होता. तसेच ते आजही आपल्या दाव्यावर ठाम आहेत एकीकडे बारणे असा दावा करत असतानाच दुसरीकडे भाजपातील नेत्यांनी देखील मावळ लोकसभा लढविण्याची तयारी सुरू केलेली उघड सत्य आहे. तर आता पार्थ पवारांचं नावं समोर करत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी देखील कंबर कसली आहे. त्यामुळेच सत्तेत एकत्र असले तरीही राष्ट्रवादी पार्थ पवारांच्या पराभवाच उट्ट काढण्याची संधी सोडणार नाही, हेच यावरून दिसते आहे. मात्र, अजून तरी घोडा मैदान लांब आहे आणि मावळ परगना जिंकण्यासाठी खरी बाजी कोण मारणार? हे लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यावरच कळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या