जिल्हा बँकांचे 101 कोटी बुडाले, पवारांनी दाखवलेले 'ते' पत्र न्यूज18लोकमतच्या हाती

जिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा, आणि ताळेबंदात लॉस दाखवा असे रिझर्व बँकेचे आदेश आहेत

Sonali Deshpande
22 फेब्रुवारी : जिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा, आणि ताळेबंदात लॉस दाखवा असे रिझर्व बँकेचे आदेश आहेत, असा गौप्यस्फोट काल शरद पवारांनी केला होता. नाबार्डचं या आशयाचं पत्र त्यांनी दाखवलं होतं.ते पत्र न्यूज18 लोकमतच्या हाती लागलंय. पुणे जिल्हा बँकेचे 22 कोटी आणि इतर 8 बँकांमधले 101 कोटी रुपये भंगारात काढा, असा धक्कादायक आदेश रिझर्व बँकेनं 31 जानेवारी 2018 रोजी दिले होते.

Trending Now