JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Jejuri : जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे शेड कोसळले, मुख्यमंत्री शिंदे राहणार होते उपस्थित

Jejuri : जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे शेड कोसळले, मुख्यमंत्री शिंदे राहणार होते उपस्थित

जेजुरीत गुरुवारी ’ शासन आपल्या दारी’ आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात

जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे शेड कोसळले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जितेंद्र जाधव, बारामती, 12 जुलै : जेजुरीत होणाऱ्या शासन आपल्या दारी हा उद्या होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला. यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तीर्थक्षेत्र जेजुरीत गुरुवारी ’ शासन आपल्या दारी’ आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे १ लाख ५७ हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेले आठवडाभर याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे. सांगा कसं शिकायचं? जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात काल दिवसभरात मुख्य व्यासपीठ आणि त्यासमोर व्हीआयपी कक्ष त्याच्या मागच्या बाजूला लाभार्थ्यासाठी मंडप उभारला जात होता. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास या कक्षाच्या मंडपसाठी लोखंडी पिलर उभारून सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असता हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाड्याखाली कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कार्यक्रमापूर्वीच सांगाडा कोसल्याने भविष्यातील मोठा अनुचित प्रकार टळल्याची चर्चा आहे.

रात्रंदिवस मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने कामगारांना अजिबात विश्रांती ही मिळत नाही. रात्री ३ वाजता सांगाडा कोसळल्यानंतर ठेकेदाराने रातोरात सांगाडा उभा करण्यासाठी कामगारांना कामाला लावले आहे. सकाळपर्यंत कोसळलेला संपूर्ण सांगाडा खोलून पुन्हा उभारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही काम करून झोपायला गेलो असता दहा मिनिटातच सांगाडा कोसळल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. दरम्यान, या भव्य सोहळ्यासाठी भव्य मंडप, लाभार्थ्यासाठी वितरण व्यवस्था, मान्यवरांसाठी वातानुकूलित कक्ष, विविध उत्पादसकांसाठी बचतगटांसाठी स्टोल, लाभार्थ्यासाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था फिरती स्वच्छतागृहे आदी सोयी सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या