फॉर्च्यूनर कार घुसली हॉटेलमध्ये, 1 मृत्यू, 3 जण जखमी

Renuka Dhaybar
30 एप्रिल : पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमध्ये भीषण अपघात झाला आहे. अनंत हॉटेलमध्ये भरधाव टोयोटा कार घुसल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर अन्य तिन जण जखमी झालेत. सांगवीत झालेल्या या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत.भरधाव वेगात येणाऱ्या फॉर्च्यूनर कारवरचा चालकाचा ताबा सुटल्यानं ती हॉटेलमध्ये घुसताना या दृश्यांमध्ये दिसत आहे. हा अपघात इतका भीषण होता की एका 65 वर्षीय हॉटेल कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Trending Now