पुण्याच्या विद्यापीठ चौकात गोळीबार, एक गंभीर जखमी

पुण्यात भर दिवसा पुन्हा एकदा गोळीबार करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणात प्रत्यक्षर्दींचीही चौकशी करण्यात येणार आहे. पण पुण्यात भर दिवसा गोळीबार होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. त्यामुळे पुण्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सामान्य नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे असं म्हणायला हरकत नाही.

पुणे, 18 ऑगस्ट : पुण्यात भर दिवसा पुन्हा एकदा गोळीबार करण्याची घटना घडली आहे. पुण्यातील विद्यापीठ चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले चौकात मोठा गोळीबार झाला आहे. सकाळी 11:30च्या सुमारास 2 अज्ञात युवकांनी एका दुचाकीस्वारावर गोळीबार केला आहे. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. गोळीबार करताच तरुणांनी घटनास्थळीवरून पळ काढला आहे.समीर येणपुरे असं जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. समीरला जवळच्या रत्ना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोथरूडमध्ये राहणाऱ्या तुकाराम मदारेसोबत पानाच्या टपरीच्या जागेवरून झालेल्या वादामुळे तुकारामने गोळीबार केलं असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून हाती लागली आहे. भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.दरम्यान, स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत. पण अद्याप गोळीबारा करणारा तुकाराम मदारे याचा पोलीस शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या प्रकरणात आणखी कोणी होत का याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Controversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धूया प्रकरणात प्रत्यक्षर्दींचीही चौकशी करण्यात येणार आहे. पण पुण्यात भर दिवसा गोळीबार होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. त्यामुळे पुण्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सामान्य नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे असं म्हणायला हरकत नाही.प्रियांका चोप्रा- निक जोन्सच्या रोकाचे फोटो पाहिलेत का?

Trending Now