कामावरून परतल्यावर पत्नीला धक्का, समोर होते नवरा आणि 2 मुलांचे मृतदेह

पिंपरी चिंचवडमध्ये एका पित्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

पुणे, 18 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडमध्ये एका पित्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पिंपरी शहरातील ताथवड़े परिसरात नृसिंह कॉलनीमध्ये राहणाऱ्या बरमन कुटुंबियांच्या घरातील ही घटना आहे. या कुटुंबातील प्रमुख दिपक बरमन यांच्यासह शुभम या दहा वर्षाच्या आणि रुपम या आठ वर्षाच्या चिमुकल्यांचा मृतदेह घरात आढळून आला. या सगळ्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.दिपक यांची पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच वेळी आपल्या पती आणि मुलांना गमावल्याने दिपक यांच्या पत्नीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, दिपक यांनी असं का केलं या मागचा पोलीस आता तपास करत आहेत. दिपक हे स्वभावाने अत्यंत साधे असल्याच स्थाविक लोकांचं सांगण आहे. त्यामुळे त्यांनी ऐवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा आता पोलीस आता शोध घेत आहेत. यात स्थानिक आणि दिपक यांच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. पण या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

VIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...!

Trending Now