कॉपी पकडण्यासाठी विद्यार्थ्यांचे कपडे उतरवल्याचा आरोप खोटा - एमआयटी शाळेचे स्पष्टीकरण

पुण्याजवळील लोणी काळभोर इथं कॉपीच्या संशयावरुन कपडे काढून तपासणी करण्यात आल्याचा आरोप 12वीच्या विद्यार्थिननं केला होता. याबद्दल लोणी कारभोर एमआयटीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar
05 मार्च : पुण्याजवळील लोणी काळभोर इथं कॉपीच्या संशयावरुन कपडे काढून तपासणी करण्यात आल्याचा आरोप 12वीच्या विद्यार्थिननं केला होता. याबद्दल लोणी कारभोर एमआयटीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विद्यार्थिनी आणि पालकांचे आरोप धादांत खोटा असल्याचं एमआयटीनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. कॉपी करुन दिल्यानं संबंधित विद्यार्थिनीनं आरोप केल्याचा दावादेखील एमआयटीच्या कार्यकारी संचालकांनी केला आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य बोर्ड तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. दरम्यान हा प्रकार घडला नसून कॉपी करू दिली नाही याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थिनी आणि पालकांनी धादांत खोटा आरोप केल्याचा दावा एमआयटी संस्थेने पत्रकार परिषदेत केला.एवढंच नाही तर कॉपी करू द्या म्हणून काही पालक शिवीगाळ धमक्या देत असल्याचा प्रति आरोप एमआयटी तर्फे करण्यात आला आहे आणि पत्रकार परिषदेत जप्त केलेल्या कॉप्यांचा गठ्ठा ही दाखवण्यात आला आहे.

Trending Now