डीएसकेंचे गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयावर

डीएसके ग्रुपमध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेत, त्यातल्या काहींनी आज थेट पुण्यातलं आर्थिक गुन्हे शाखेचं कार्यालयच गाठलं. डीएसकेंविरोधात जोपर्यंत एफआयआर दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही.

Sonali Deshpande
पुणे, 01 नोव्हेंबर : invester, आमचे लाखो रुपये अडकलेत, कुणाच्या घरात लग्न आहे तर कुणाच्या आईचं ऑपरेशन आहे, अशा भावना गुंतवणूकदार व्यक्त करतायेत.डी एस कुलकर्णींनी आपला शब्द पाळला नाही, ते फक्त या तारखेला पैसे देतो, त्या तारखेला देतो,त्यांचं हेच सुरूय, अशी त्यांची तक्रार आहे. डीएसके यांची मालमत्ता जैसे थे ठेवावी, असा अर्ज आम्ही करू, असं आश्वासन आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिलंय.नोटबंदीमुळे बांधकाम व्यवसायात मंदी आली, आणि त्यात भर म्हणजे माझा अपघात झाला. त्यामुळे सगळेच अचानक पैसे मागू लागले, अशी डीएसकेंची भूमिका आहे.

Trending Now