डीएसके यांचे सर्व रिपोर्टस् नाॅर्मल, डाॅक्टरांचा अहवाल

ससूनमध्ये त्यांच्या सीटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Sonali Deshpande
23 फेब्रुवारी : बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना सकाळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. ससूनमध्ये त्यांच्या सीटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.थोड्या वेळाने मेडिकल बोर्डाचा अहवाल घेऊन पोलीसकोर्टात जातील. दुपारी कोर्टात पोलीस डीएसके यांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. आज त्यांची रिमांड संपत आहे. कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष आहे.कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली, त्यामुळे उपचारासाठी त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोर्टानं  डीएसकेंना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं. कर्जाच्या या सगळ्या तणावामुळे ते कोठडीत खाली पडले.

 

Trending Now